‘गणपतीमध्ये डॉल्बी लावणारच!’, उद्यनराजेंनी थेट पोलिसांनाच दिलं आवाहन

 

वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असणारे खासदार उद्यनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्यनराजेंनी दणक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी थेट पोलिसांना आवाहन दिले आहे. गणेशोत्सवादरम्यान डिजे लावणारच असे सांगत उद्यनराजेंनी थेट कायदा मोडण्याची भाषा केली आहे. साताऱ्यामधील एका गणपती आगमन सोहळ्यामध्ये त्यांनी कायद्याची भिती न ठेवता डीजे लावण्याचा आदेशच आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. उद्यनराजे स्टाइल डायलॉगबाजी करत त्यांनी, ‘जब तक हैं जान तब तक डॉल्बी रहेगी’ असे सांगितले. आपण खरे गणेशभक्त असल्याने दणक्यातच गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर करत थेट पोलिसांनाच आवाहन दिले आहे. आता यावर पोलिस काय भुमिका घेतात हे गणेशोत्सवादरम्यान कळेलच.

काय म्हणाले उद्यनराजे

सातारा शहरामध्ये एका गणपती आगमनावेळी उद्यनराजेंनी तेथे उपस्थित असणाऱ्या गणेश भक्तांना आणि कार्यकर्त्यांशी स्टेजवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी डॉल्बी लागलीच पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होतं. डॉल्बी लागलीच पाहिजे, डेसीबल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस खाते कोण
आहेत? डेसीबल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक असे मत उद्यनराजे यांनी मांडताच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला समर्थन दिले. पुढे बोलताना एक दोन दिवस त्रास झाला तर सहन करायला हरकत नाही असेही ते म्हणाले. आम्ही खरे गणेशभक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. आणि तरीही त्रास झालाच तर एक दोन दिवस सहन केल्यास काही जात नाही असं उद्यनराजे म्हणाले.

सुसंस्कृत पोरांचं ऐकतं नाहीत

यावेळी मोठ्या आवाजाच्या दुष्परिणामांवरही उद्यनराजेंनी भाष्य केलं. मोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात, हे पडतं… ते पडतं… या असल्या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. आणि तसं असेलच तर जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा असा अजब सल्लाही त्यांनी दिली. बिचाऱ्या “सुसंस्कृत पोरांचे” हट्ट तुम्ही ऐकून घेत नाही. यासंदर्भात काय करायचं हे आमच्या पद्धतीने पाहिलं जाईल असं सांगतच ही धमकी नाही तर समज देतोय अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. भाषणाच्या शेवटी त्यांनी थेट पोलिसांनाच आवाहन दिले. प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जावा डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी. जब तक गणपती रहेगा तब तक डॉल्बी रहेगी असं म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

नांगरे पाटलांची तंबी

उद्यनराजेंच्या या आवाहन देणाऱ्या भाषणानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काद्याचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी न्यायालय आणि पोलिसांच्या आदेशाचे पालन करुन कायदयाचा आदर करावा कुठेही डॉल्बी लावू देणार नाही अशी तंबीही त्यांनी दिली आहे.

तुमच्या Aadhar कार्डचा गैरवापर तर होत नाही ना? या Trick ने एका मिनिटांत जाणून घ्या, समोर येईल यादी

How To Check Who Used My Aadhar Card In A Minute, Watch Online Process

बिझनेस डेस्क – भारतात आधार कार्ड आता जवळपास प्रत्येक वस्तू आणि आवश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. हे फक्त एक कागद नव्हे, तर यावर आपले युनिक आयडी नंबर, बोटांचे ठसे, डोळ्यांचे युनिक कोड आणि अतिशय गोपनीय अशी माहिती आहे. त्यामुळे, अशा कार्डची काळजी घेणे तेवढेच गरजेचे बनले आहे. बँक खात्यापासून सिम कार्ड खरेदी करण्यापर्यंत आवश्यक बनलेल्या तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना? आणि होत असेल तर त्याची माहिती कशी मिळवाल? याची सरळ आणि सोपी माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आपल्याला केवळ 2 स्टेप्स फॉलो करून आधारचा कुठे-कुठे आणि कसा वापर होत आहे याची माहिती मिळू शकते. या संपूर्ण माहितीच्या प्रक्रियेसाठी फक्त 1 मिनिट लागेल.